YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 1:1-7

उत्पत्ती 1:1-7 MARVBSI

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले.