YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 6:14-18

गलतीकरांस पत्र 6:14-18 MARVBSI

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण [ख्रिस्त येशूमध्ये]सुंता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती1 हीच काय ती होय. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो. ह्यापुढे कोणी मला त्रास न देवो; कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.