आता मी म्हणतो की, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो; पण बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभार्यांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो; परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने “अब्बा! बापा!” अशी हाक मारणार्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठवले आहे.
गलतीकरांस पत्र 4 वाचा
ऐका गलतीकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलतीकरांस पत्र 4:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ