YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 2:17-21

गलतीकरांस पत्र 2:17-21 MARVBSI

ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वत:ला उल्लंघन करणारा ठरवतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.