YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 1:15-24

गलतीकरांस पत्र 1:15-24 MARVBSI

तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता, आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो. मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते खोटे लिहीत नाही; हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूरिया व किलिकिया ह्या प्रांतांत मी आलो. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणार्‍या यहूदीयातील मंडळ्यांना माझी तोंडओळख नव्हती; त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे, त्याची तो आता घोषणा करत आहे.” आणि ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत.