बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले, तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;” पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.” तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले. त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले; पारसाचा राजा कोरेश ह्याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते.
एज्रा 4 वाचा
ऐका एज्रा 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एज्रा 4:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ