आता वंशांची नावे ही : उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग. दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो आशेराचा विभाग. आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो नफतालीचा विभाग. नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग. मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग. एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग. रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग. यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश पंचवीस हजार हात1 रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार. परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा.
यहेज्केल 48 वाचा
ऐका यहेज्केल 48
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 48:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ