परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, जे यरुशलेमनिवासी, ‘परमेश्वरापासून दूर राहा, आम्हांलाच देश वतन मिळाला आहे,’ असे म्हणतात ते तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, तुझे आप्तजन, इस्राएलाचे सबंध घराणे आहेत; ह्याकरता असे म्हण, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी त्यांना राष्ट्रांत दूर घालवून देऊन देशोदेशी पांगवले आहे, तरी ज्या ज्या देशात ते गेले त्यांत मी त्यांना अल्पकाळ पवित्रस्थान होईन.’ ह्यास्तव असे म्हण : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला राष्ट्रांतून गोळा करून आणीन; ज्या ज्या देशांत तुम्ही पांगला आहात त्यांतून मी तुम्हांला गोळा करून घेईन, आणि इस्राएल देश तुम्हांला देईन.’ ते येथे येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तू येथून काढून टाकतील. मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन; म्हणजे ते माझ्या नियमांना अनुसरून चालतील; माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.” तेव्हा करूबांनी आपले पंख उचलले, त्यांच्याबरोबर चाकेही उचलली गेली आणि इस्राएलाच्या देवाचे तेज त्यांच्यावर होते. मग परमेश्वराचे तेज नगराच्या मध्यभागाहून वर चढून नगराच्या पूर्वेस असलेल्या पर्वतावर राहिले. तेव्हा त्या आत्म्याने दृष्टान्तात मला उचलून घेऊन खास्दी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले आणि जो दृष्टान्त मी पाहत होतो तो माझ्या डोळ्यांआड झाला. मग परमेश्वराने मला सांगितलेली सर्व वचने, धरून आणलेल्या त्या लोकांना मी सांगितली.
यहेज्केल 11 वाचा
ऐका यहेज्केल 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 11:14-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ