तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “मी ह्या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत. तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.” मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तुम्ही आणि तुमचे सेवक परमेश्वर देव ह्याला भीत नाहीत.” त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती. पण गहू व काठ्यागहू ह्यांचा नाश झाला नाही; कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते. मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला. पाउस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही; परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते.
निर्गम 9 वाचा
ऐका निर्गम 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 9:27-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ