YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 6:13-30

निर्गम 6:13-30 MARVBSI

ह्या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांच्याशी बोलला; मिसर देशातून इस्राएल लोकांना बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्राएल लोकांसंबंधी आणि मिसराचा राजा फारो ह्यांच्यासंबंधी आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे : इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन ह्याचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी; ही रऊबेनाची कुळे. शिमोनाचे मुलगे : यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व कनानी स्त्रीपासून झालेला शौल; ही शिमोनाची कुळे. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या-त्यांच्या कुळाप्रमाणे हे : लिब्नी व शिमी. कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते. मरारीचे मुलगे : महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत. अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. इसहाराचे मुलगे : कोरह, नेफेग व जिख्री. उज्जीएलाचे मुलगे : मीशाएल, एलसाफान व सिथ्री. अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले. कोरहाचे मुलगे : अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे. अहरोनाचा मुलगा एलाजार ह्याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली; तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या-त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच. इस्राएल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे. इस्राएल लोकांना मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो ह्याच्याशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन. मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. त्या दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे; मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो ह्याला सांग.” तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, मी बेसुनत (जड) ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?”