YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 6:1-6

निर्गम 6:1-6 MARVBSI

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्‍यांदा झालेले पाचारण देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना सर्वसमर्थ1 देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर2 ह्या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे; शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्‍यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन