ह्या प्रकारे दर्शमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी हे सर्व केले. त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या; आणि लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी आणि अंतरपट; साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन; मेज, त्यावरील सर्व सामान व समक्षतेची भाकर; शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावायचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल; सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा; पितळी वेदी आणि तिची पितळेची जाळी, तिचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक; अंगणाचे पडदे (अंगणाच्या कनाती), खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य; पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तिला अनुसरून इस्राएल लोकांनी सगळे काम केले. लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.
निर्गम 39 वाचा
ऐका निर्गम 39
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 39:32-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ