YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 36:3-7

निर्गम 36:3-7 MARVBSI

आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला. इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, आणि ते मोशेला म्हणाले, “परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की, कोणाही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. ह्याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.