मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे; तो कलाकुसरीची कामे करील; सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील; जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.
निर्गम 35 वाचा
ऐका निर्गम 35
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 35:30-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ