तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणीही वर चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये, तसेच शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये.” तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सीनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला, आणि त्याने ‘परमेश्वर’ ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.” तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले
निर्गम 34 वाचा
ऐका निर्गम 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 34:2-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ