YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 31:2-6

निर्गम 31:2-6 MARVBSI

“पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील. जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात.