मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे; ह्यावरून हे कळावे की, तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही शब्बाथ पाळावा; तो तुमच्यासाठी पवित्र आहे; जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा. सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे. इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये व इस्राएल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय; कारण परमेश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला.”
निर्गम 31 वाचा
ऐका निर्गम 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 31:12-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ