आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद, ही सर्व समभाग घ्यावीस. आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस; त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे. जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये; हे परमेश्वराप्रीत्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”
निर्गम 30 वाचा
ऐका निर्गम 30
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 30:34-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ