परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.” संध्याकाळी असे झाले की लावे पक्षी येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दंव पडले. हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्राएल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, “हे काय?”1 कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हांला खायला दिले आहे ते हेच. परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की, प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे; ज्याच्या-त्याच्या डेर्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एकेक ओमर जमा करावे.” इस्राएल लोकांनी तसे केले; कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही; प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते. मोशेने त्यांना सांगितले की, “कोणीही ह्यांपैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली; त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला.
निर्गम 16 वाचा
ऐका निर्गम 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 16:11-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ