YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 13:1-10

निर्गम 13:1-10 MARVBSI

मग परमेश्वराने मोशेला सांगितले की, “इस्राएल लोकांमध्ये मनुष्य व पशू ह्या दोहोंच्या प्रथमजन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.” बेखमीर भाकरीचा सण मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही. तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात, कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा. ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये. त्या दिवशी तू आपल्या मुलाला सांगावे की, ‘मी मिसर देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळत आहे.’ हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले; म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या काळी हा विधी पाळावा. प्रथमजन्मलेले अपत्य