YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 12:21-28

निर्गम 12:21-28 MARVBSI

मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा. नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. हा विधी तुम्हांला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हांला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा. तुमची मुलेबाळे तुम्हांला विचारतील की, ह्या सेवेचा अर्थ काय? तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले. इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा