मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही. मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तर आता एवढ्या एकाच वेळेस माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याजवळ विनंती करा.” तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली. तेव्हा परमेश्वराने पश्चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही.
निर्गम 10 वाचा
ऐका निर्गम 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 10:13-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ