YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 1:6-14

निर्गम 1:6-14 MARVBSI

नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्व जण मरण पावले. इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, “पाहा, ह्या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत; तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.” त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली; पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्राएलवंशजांचा तिटकारा वाटू लागला; म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले; त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतर्‍हेची कामे करायला लावत. असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.