यहूदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यांना लिहून पाठवले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले; सर्व यहूद्यांचा विरोधक अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने यहूद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या; पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले. ह्यास्तव पूर ह्या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाव पडले. ह्या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः ह्या बाबतीत जे पाहिले होते आणि त्यांच्यावर जे बेतले होते त्यावरूनही, यहूदी लोकांनी आपणांसाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यांना सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की, त्या लेखानुसार प्रत्येक वर्षी नेमलेल्या समयानुसार हे दोन दिवस पाळावेत. आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात ह्या दिवसांचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. ह्या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहूदी लोकांनी चुकू नये; त्यांचे स्मरण आमच्या वंशजांतून कधीही नाहीसे होऊ नये. ह्या दुसर्या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहाइलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहूदी ह्याने आपल्या अधिकाराने फर्मान लिहिले. त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती; ह्या पत्राचा आशय असा होता की, पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहूदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा. पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुक्रर झाला, आणि हे ग्रंथात लिहून ठेवले.
एस्तेर 9 वाचा
ऐका एस्तेर 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 9:23-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ