एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहूद्यांना मुभा असावी आणि हामानाच्या दहा पुत्रांना फाशी देण्याच्या खांबांवर लटकवावे.” त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली. शूशन येथून फर्मान निघाले व लोकांनी हामानाच्या दहा पुत्रांना फासावर लटकवले. शूशन येथील यहूद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकत्र होऊन शूशन येथील तीनशे पुरुष मारले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही. राज्यातील निरनिराळे यहूदी एकत्र होऊन आपला प्राण वाचवण्यास उभे राहिले; त्यांनी आपल्या वैर्यांपैकी पंचाहत्तर हजार लोकांचा संहार केला व ते वैर्यांपासून विसावा पावले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही. अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला; पण शूशन येथले यहूदी तेरावा व चौदावा अशा दोन दिवशी एकत्र झाले आणि पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला. ह्याकरता खेडेगावचे यहूदी जे गावकूस नसलेल्या गावांत राहतात ते अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगलदिन व एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्याचा दिवस ठरवून पाळतात.
एस्तेर 9 वाचा
ऐका एस्तेर 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 9:13-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ