YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 8:7-10

एस्तेर 8:7-10 MARVBSI

मग अहश्वरोश राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहूद्यास म्हणाला, “हामानाने यहूद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले. तुम्हांला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहूद्यांविषयी लिहा, आणि पत्रावर राजाची मोहर करा; राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यांवर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही.” त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्‍या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी ह्यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली.