त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी. हे सर्व एकाच दिवशी बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या त्रयोदशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत करण्यात यावे.’ फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहूद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकांना जाहीर करण्यात आले. डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला.
एस्तेर 8 वाचा
ऐका एस्तेर 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 8:11-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ