मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले. राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, “पाहा, हामानाच्या येथे पन्नास हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे; ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे.” राजाने म्हटले, “त्याच खांबावर ह्याला फाशी द्या.” तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.
एस्तेर 7 वाचा
ऐका एस्तेर 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 7:8-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ