राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या खोजांपैकी हथाक ह्याला तिने बोलावून आणून सांगितले की, मर्दखयाकडे जाऊन हे काय व असे का ह्याची चौकशी कर. हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला. आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहूदी लोकांचा वध व्हावा म्हणून हामानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकिकत मर्दखयाने त्याला सांगितली. यहूदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस.
एस्तेर 4 वाचा
ऐका एस्तेर 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 4:5-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ