ह्यानंतर अहश्वेरोश राजाचा क्रोध शमला, तेव्हा त्याला वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता ह्याचे स्मरण झाले. मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा; राजाने आपल्या राज्याच्या सर्व प्रांतांत अंमलदार नेमावेत, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन राजवाड्यातील अंतःपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्यात आणि त्यांच्या शुद्धतेसाठी असलेल्या वस्तू त्यांना द्याव्यात. मग त्यांपैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वश्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी.” ही गोष्ट राजाला पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले. शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता; बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते; तिला आईबाप नव्हते; ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली. एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते.
एस्तेर 2 वाचा
ऐका एस्तेर 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एस्तेर 2:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ