पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे आहोत] आहोत.
इफिसकरांस पत्र 5 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 5:25-30
३ दिवस
वचनबद्धतेची शब्दकोश व्याख्या आहे “एखाद्या निमित्तासाठी, क्रियेसाठी किंवा नातेसंबंधासाठी समर्पित असण्याची स्थिती किंवा गुणवत्ता.” ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आम्हाला वचनबद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. वचनबद्धता हे एक शक्तिशाली बळ आहे जे आपल्याला देवासोबतच्या आपल्या चालचलणुकीत चिकाटी, धैर्य आणि भरभराट करण्यास प्रवृत्त करते.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ