म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे.
इफिसकरांस पत्र 4 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 4:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ