YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 1:3-7

इफिसकरांस पत्र 1:3-7 MARVBSI

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे; त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.

इफिसकरांस पत्र 1:3-7शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे  DNA समजून घेणे इफिसकरांस पत्र 1:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणे

6 दिवस

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.