YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 1:16-19

इफिसकरांस पत्र 1:16-19 MARVBSI

मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे.