म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले; आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले; त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले; हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1
इफिसकरांस पत्र 1 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 1:15-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ