YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 5:10-16

उपदेशक 5:10-16 MARVBSI

ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ! संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो? कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे; त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते; आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही. तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही. तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?