मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे. मला हेदेखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार; ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही; मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवतो.
उपदेशक 3 वाचा
ऐका उपदेशक 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उपदेशक 3:9-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ