YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 8:18-20

अनुवाद 8:18-20 MARVBSI

पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल हे मी तुम्हांला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यादेखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.