YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 8:11-15

अनुवाद 8:11-15 MARVBSI

सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि रुक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले; त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले