तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करील. तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल. तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील; तुझ्यातला किंवा तुझ्या पशूंतला कोणी नर किंवा मादी वांझ राहणार नाही; आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यांतली एकही तुला लागणार नाही; पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील.
अनुवाद 7 वाचा
ऐका अनुवाद 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 7:12-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ