YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 4:1-6

अनुवाद 4:1-6 MARVBSI

आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात. बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’