तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील, आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा. आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण : ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’ मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.
अनुवाद 26 वाचा
ऐका अनुवाद 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 26:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ