YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 24:16-19

अनुवाद 24:16-19 MARVBSI

मुलांसाठी बापांना जिवे मारू नये अथवा बापांसाठी मुलांना जिवे मारू नये; जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जिवे मारावे. उपर्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस, तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे. तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नकोस; उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल.