आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढरू भटकत असलेले पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस; ते अवश्य आपल्या बांधवाकडे पोचते कर. तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण, आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे; आणि मग ते त्याच्या हवाली कर. तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर; आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर; आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर; ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस. आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस, त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर.
अनुवाद 22 वाचा
ऐका अनुवाद 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 22:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ