YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 2:1-7

अनुवाद 2:1-7 MARVBSI

मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच केले आणि पुष्कळ दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहात, आता उत्तरेकडे वळा; आणि लोकांना आज्ञा कर की, सेईरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हांला जायचे आहे; त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा. त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हांला देणार नाही; कारण सेईर डोंगर एसावाला वतन म्हणून मी दिला आहे. पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या. कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’