तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा; तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावेस; आपल्या भाऊबंदांतून आपल्यावर राजा नेमावास; तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नयेस. मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वत:साठी उतरून घ्यावी; ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल. असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.
अनुवाद 17 वाचा
ऐका अनुवाद 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 17:14-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ