YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 10:1-5

अनुवाद 10:1-5 MARVBSI

त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, ‘पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये; लाकडाचा एक कोशही तयार कर. मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तू कोशात ठेव.’ त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला आणि पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून व त्या हातात घेऊन पर्वतावर गेलो. मंडळी जमली होती त्या दिवशी जी दहा वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली होती तीच त्याने पहिल्याप्रमाणे ह्या पाट्यांवर लिहिली आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या; परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत.