YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1:6-8

अनुवाद 1:6-8 MARVBSI

“परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणांला सांगितले की, ‘तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिलात त्याला बरेच दिवस झाले; तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा. पाहा, हा देश मी तुमच्यापुढे ठेवला आहे, म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्यामागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे, त्यात जाऊन तो वतन करून घ्या.’