YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1:41-46

अनुवाद 1:41-46 MARVBSI

तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की, ‘आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू;’ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास तयार झालात. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही; गेलात तर शत्रू तुमचा मोड करील.’ त्याप्रमाणे मी तुम्हांला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही; उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अमोर्‍यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले. तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागलात; पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात, ते तुम्हांला ठाऊकच आहे.