तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने पालथे पडून दानिएलास साष्टांग नमस्कार घातला आणि ‘त्याच्यापुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा’ अशी आज्ञा केली. राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.” मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला; पण दानीएल राजदरबारी असे.
दानीएल 2 वाचा
ऐका दानीएल 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 2:46-49
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ